मुंबई : गणेशोत्सवात मुंबईत श्रीगणेशाचे आगमन आणि विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या १५ उड्डाणपुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून संबंधित वॉर्डांमधील अभियंत्यांना पाहणीचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि पोलिसांची बैठक गुरुवारी झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील खड्डे ११ ऑगस्टपूर्वी बुजवावेत, तसेच आगमन-विसर्जनासाठी शीव उड्डाणपूल […]