प्रतिनिधी, पुणे : जुन्नर वन विभागाच्या हद्दीत गेल्या पाच वर्षांत बिबट्याच्या हल्यात अनेक नागरिक जखमी झाले असून, काहींचा मृत्यूदेखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यांतील २३३ अतिसंवेदनशील गावांना ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी जाहीर केले आहे. पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, […]