प्रतिनिधी, पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील कारचालक अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांना शनिवारी (एक जून) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ससून रुग्णालयात कारचालकाचा रक्त नमुना बदलण्यासाठी दिलेले रक्त माझेच असल्याची कबुली अल्पवयीन मुलाच्या आईने पोलिसांसमोर दिली. त्यानंतर आईसह वडिलांनाही या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. शिवानी अगरवाल यांच्या रक्ताची डीएनए चाचणी […]