पुणे : सलग तीन वेळा शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या मावळ मतदारसंघाचा गड राखण्यासाठी यंदा सेनेतच लढाई जुंपली आहे. सद्यस्थितीत प्राबल्य असूनही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सहकारी भूमिकेत राहावे लागले आहे. बदलत्या राजकीय समीकरणात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे महायुतीच्या माध्यमातून विजयाची हॅटट्रिक करण्यास उत्सुक आहेत. मात्र, त्यांच्यापुढे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी आव्हान […]