प्रतिनिधी, पुणे : हलाखीची परिस्थिती असूनही, खचून न जाता दिवसा हॉटेलमध्ये काम आणि रात्रीच्या वेळेस अभ्यास करून प्रशांतजित सोनू बेंडलने ७८.५० टक्के गुण मिळवून रात्रशाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. वाणिज्य शाखेत शिक्षण घेऊन, पुढे बँकिंग, फायनान्समध्ये काम करणार असल्याचे प्रशांतजितने सांगितले.प्रशांतजित हा मूळचा चिपळूणचा आहे. गेल्या काही वर्षांपासून आईसह लक्ष्मीनगर येथे राहत असून, त्याचे वडील […]