प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर; तसेच वेल्हा तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले, स्मारक; तसेच पर्यटनस्थळ आणि धरणांच्या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी येत्या ३१ जुलैपर्यंत पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.जिल्ह्यात भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात नागरिकांची पर्यटनासाठी गर्दी होते. सुट्टीच्या दिवशी पुणे-मुंबईसह अन्य भागांतून पर्यटकांची […]