मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत सरकारने घोषित केली होती. मात्र, आता या दुर्घटनेला नैसर्गिक आपत्तीचे निकष लावून जखमींना मदत देण्यात येणार आहे. सातपेक्षा कमी दिवस रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींना ५,४०० रुपये, सातहून अधिक दिवस वैद्यकीय उपचार घेणाऱ्या जखमींना १६ हजार रुपयांची मदत सरकार देणार आहे. अद्याप एकाही […]