Posted inमुंबई

गृहिणींसाठी कामाची बातमी; पावसाची दडी अन् भाज्या महागल्या, दर प्रतिकिलो शंभर रुपयांवर

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : मागील महिन्यापासून वाढलेले भाज्यांचे दर सध्याही वाढतच आहेत. पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे शेतपिकांना योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे मुंबईला होणारा भाजीपाल्याचा पुरवठाही कमी झाला आहे. मागणी इतका पुरवठा होत नसल्याने, भाजीपाल्याचे दर वाढतच आहेत. […]