प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल शुक्रवारी लागणार आहे. या खटल्यात पाच आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले असून, हत्येच्या घटनेला पावणे अकरा वर्षे उलटून गेल्यावर हा खटला निकाली निघणार आहे.डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर […]