रोहन टिल्लू, मुंबई : ‘एक राज्य, एक गणवेश’ या योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळण्यासाठी आणखी दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार हे गणवेश १५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने गणवेशाच्या कापडांची गुणवत्ता तपासणी केली असून या तपासणीसाठी […]