प्रतिनिधी, पुणे : राज्यात डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, गेल्या १५ महिन्यांमध्ये २० हजार ७८४ रुग्ण आढळून आले आहे, तर २१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील काही भागांमध्ये अतिप्रमाणात होणारा पाऊस, वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणावर होणारी बांधकामे या कारणांमुळे डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.डेंगीला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज […]