मुंबई : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशभरात अनेक गरजूंचे हक्काच्या निवाऱ्याचे स्वप्न पूर्ण होत असताना, या योजनेतील निधीचा वापर अपात्र लोकांसाठी करण्यात आल्याचा तसेच प्रत्यक्षात घरकुल न बांधता जुन्याच घरासमोर छायाचित्र काढून निधीचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यात समोर आला आहे. याविषयीच्या तक्रारीची दखल घेत, राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे […]