प्रतिनिधी, मुंबई: ‘मराठी माणसांना गुजराती सोसायट्यांमध्ये प्रचारासाठी मनाई केली जात असून भाजपमुळेच ही मस्ती वाढली आहे. भाजपचे सरकार डोक्यावर बसल्यास घरोघरी सीसीटीव्ही लावतील. मटण खायचे की भाजी तेच सांगतील’, अशा शब्दांत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपला स्वातंत्र्य हिरावून घ्यायचेय आणि भारताचा चीन करायचे आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. […]