मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीची झालेली सुमार कामगिरी, महाविकास आघाडीची घोडदौड, त्यानंतर महायुतीत सुरु झालेली सुंदोपसुंदी, संघाच्या मुखपत्रातून भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर झालेली टीका अशा घडामोडी सध्या सुरु आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे भाजपचा ब्रँड डॅमेज झाल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनाझर’मधून करण्यात आली. त्यावर भाष्य करताना भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी चक्रधर स्वामींची गोष्ट […]