Posted inमुंबई

Mumbai Express Trains Today: मुंबईत धुवाधार! पावसाचा ‘एक्सप्रेस’वर परिणाम, पुणे-मुंबई ट्रेन रद्द

मुंबई : मुंबईत झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे मुंबई नगरी ठप्प झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले आहे. तर लोकलसेवा देखील विस्कळीत झाली असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातच एक्सप्रेस रेल्वे सेवेवर देखील पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. परिणामी लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागणार आहे. […]