मुंबई: नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत ७१ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यातील ३० जण कॅबिनेट मंत्री, ३६ जण राज्यमंत्री असतील, तर ५ जणांकडे स्वतंत्र प्रभार असेल. भाजपला लोकसभेत बहुमत नसल्यानं मित्रपक्षांच्या साथीनं मोदी सत्तेवर आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात मित्रपक्षांना वाटा देण्यात आलेला आहे. शिंदेसेना आणि रिपाईंला प्रत्येकी एक मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. […]