मुंबई : ‘शहरात मराठी-गुजराती वाद जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत आहे. महागाईच्या मुद्द्यावर बोलता येत नसल्याने धार्मिक विषमतेने सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम काही लोकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यामुळे ही निवडणूक मराठी व मुंबईच्या अस्मितेसाठी लढणार आहे’, असे ठाम मत उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा कट्टा’ कार्यक्रमात सहभागी होत मांडले. ‘उत्तर-मध्य […]