प्रतिनिधी, पिंपरी : इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी २२ ठिकाणी खासगी एजन्सीद्वारे ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणारण्याला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्वत: बांधा आणि संचलित करा’ या तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिकेमार्फत ईव्ही चार्जिंग स्टेशन आठ वर्षे कालावधीसाठी २२ ठिकाणी वाजवी दराने वेगवेगळ्या एजन्सींकडून उपलब्ध करून देण्याचे […]