प्रतिनिधी, पुणे : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी निर्माण केलेल्या कथनाचा (नरेटिव्ह) भारतीय जनता पक्ष व महायुतीला फटका बसला. त्याला योग्य प्रत्युत्तर देता आले नाही. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा कथनावरच भर असेल. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना देत पराभवाची कारणमीमांसा केल्याचे […]