मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत एकटे पडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी या प्रकरणी विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल करत अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांसह बँकेच्या ८० संचालकांना क्लीन चिट दिली होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या अहवालाला विरोध करण्यासाठी सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) विशेष […]