प्रतिनिधी, पुणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अनंत चतुर्दशीनंतर केव्हाही जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून विकासकामांचे कार्यादेश वेळेत न दिल्यास यंदा पुणे महापालिकेचा जेमतेम २५ टक्केच निधी खर्च होण्याची भीती आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेमध्ये अधिक कालावधी गेल्यास निधी योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार नसल्याची […]