मुंबई: लोकसभा निवडणुकीत झटका बसलेल्या महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून राज्य सरकारनं अर्थसंकल्पातून महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. सरकारच्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे. सरकारच्या योजनांमुळे जवळपास १ कोटी कुटुंबांना महिन्याला ५ हजार रुपयांची मदत मिळेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा मोठा लाभ महायुतीला मिळू शकतो. त्यामुळे विरोधकांचं टेन्शन वाढलं आहे. […]