प्रतिनिधी, मुंबई : हाथरसमध्ये भोले बाबा यांच्या सत्संगाचा वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२१ भाविक मृत्यूमुखी पडले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू झालेला जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवरही लागू व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. महाराष्ट्रात लागू झालेला कायदा संसदेत मांडण्याची विनंती महाराष्ट्रातील खासदारांना करण्यात येणार आहे. अंनिसने यासंदर्भात एक पत्रक प्रसृत केले आहे.अशा स्वरूपाच्या घटनाच्या […]