प्रतिनिधी, मुंबई : स्थानिक पर्यावरणासाठी साह्यभूत ठरतील अशा झाडांच्या संगोपनासाठी मुंबईकरांकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. देशी झाडांचे बीजसंकलन करून येत्या पावसाळ्यात विविध संस्था, विद्यार्थ्यांपर्यंत या बिया पाठवण्यात येणार आहेत. ‘हरियाली’ संस्थेच्या मुलुंड विभागातर्फे १० हजार आंब्याची रोपे तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच विलेपार्ले येथील म. ल. डहाणूकर कॉमर्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा […]