मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात असल्याने एकाचा पराभव अटळ आहे. काँग्रेसचे नऊ आमदार फुटण्याची भीती वारंवार व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवासी झालेले नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांनी काल काँग्रेसच्या बैठकीला अनुपस्थिती लावली होती. मात्र आज मतदान केल्यानंतर काँग्रेस आमदारांसोबत त्यांची थट्टामस्करी पाहायला मिळाली. […]