मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आधी झालेली फोडाफोडी, हातून गेलेला पक्ष, गमावलेले चिन्ह तसेच प्रमुख नेत्यांनी सोडलेली साथ अशा विपरीत परिस्थितीत ज्येष्ठ नेते शरद पवार निवडणुकांना सामोरे गेले. महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढविलेल्या निवडणुकीत त्यांच्या वाट्याला १० जागा आल्या. प्रत्येक जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी निकराची लढाई केली. शरद पवार यांनीही प्रत्येक मतदारसंघात जाऊन भाजपविरोधात दंड थोपटून जनतेला […]