प्रतिनिधी, मुंबई : मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यान असलेला ब्रिटीशकालीन १३० वर्षे जुना बेलासिस पूल लवकरच पाडून पुनर्बांधणी केली जाणार आहे. निवडणुकीनंतर हे पाडकाम होणार असल्याचे सांगितले जाते आहे. दरम्यानच्या काळात पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पोहोच रस्त्यांचे काम होणार असल्याने पूल शनिवारी मध्यरात्रीपासून अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलाच्या कामासाठी मुंबई […]