प्रतिनिधीराज्यसभेची येत्या २५ जून रोजी होऊ घातलेली पोटनिवडणूक आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी होणारी विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० जून ऐवजी २७ जून २०२४ पासून घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानंतर आता कामकाज सल्लागार समितीची बैठक होऊन त्यात अधिवेशनाचे कामकाज निश्चित केले जाईल. […]