पुणे : राज्य सरकारने पेपरफुटीविरोधात कायदा करण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात विधेयक आणले आहे. मात्र, या कायद्याच्या कक्षेतून सरकारी, खासगी आणि अभिमत विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा; तसेच राज्य मंडळांसोबतच इतर मंडळांद्वारे घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा वगळल्या आहेत. त्यामुळे पेपरफुटी कायदा ठरावीक परीक्षांपुरता मर्यादित राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे प्रस्तावित कायद्यातील शिक्षेच्या तरतुदी कठोर […]