प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग अंशत: उचलून तो गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाला समांतर उंचीवर जोडण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महापालिकेने पूर्ण केले आहे. बर्फीवाला पुलावरील सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर ‘व्हीजेटीआय’ने महापालिकेला या मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून बर्फीवाला पुलावरून […]