प्रतिनिधी, पुणे : मार्च आणि एप्रिलमधील उन्हाच्या तडाख्याचा फटका पुणे जिल्ह्यातील डोंगर-दऱ्यांनाही बसला. उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे चालू वर्षातील साडेचार महिन्यांत जिल्ह्यात (जानेवारी ते १५ मे) ‘फॉरेस्ट फायर अॅलर्ट सिस्टीम’वर वणव्यांच्या ९४९ नोंदी झाल्या. पुणे शहर आणि लगतच्या डोंगररांगांवर तीन महिन्यांत ५६ वणव्यांची नोंद झाली असून, त्यामध्ये ११६.७३ हेक्टर वन क्षेत्र होरपळले आहे. जानेवारीपासूनच वणव्यांचे सत्र […]