पुणे : रिक्षा, कॅबचालक आणि खासगी ट्रॅव्हल्स यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) सुरू केलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रारींऐवजी शुभेच्छा व माहिती विचारणारे संदेशच सर्वाधिक येत आहेत. त्यामुळे मूळ उद्देश बाजूला राहत असून, शुभेच्छांमध्ये तक्रारीचा संदेश शोधण्यात अडचणी येत आहेत. शहरात रिक्षाने प्रवास करताना बऱ्याच वेळा त्यांच्या उद्धटपणाचा अनुभव नागरिकांना येतो. अनेक जण भाडे […]