प्रतिनिधी, येरवडा/पुणे : येरवडा वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक रात्रपाळीवर असताना कल्याणीनगर चौकात एका तरुणाकडून पाय दाबून घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुणे पोलिस पुन्हा एकदा टीकेचे धनी झाले आहेत. ‘रात्रपाळीवर कर्तव्यावर असताना अचानक रक्तातील साखर वाढली आणि चक्कर येऊ लागली. त्यामुळे मी माझे पाय दाबत होतो. ते पाहून एका तरुणाने पाय दाबून देण्याची दर्शवली,’ […]