प्रतिनिधी, पुणे : आवक घटल्याने सर्व प्रकारच्या भाज्या महागल्या आहेत. बटाटा, भेंडी, टोमॅटो, हिरवी मिरची, शिमला मिरची, वांगी, फ्लॉवरसह सर्व प्रकारच्या फळभाज्यांच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोथिंबीर आणि मेथीची गड्डी पन्नास रुपयांना विकली जात आहे. गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे ७५ ते ८० ट्रक […]