प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात अडीच वर्षांपूर्वीच दाखल होणाऱ्या १७७ ई-बस अद्याप मिळालेल्या नाहीत. एकीकडे ‘पीएमपी’च्या ताफ्यातील बस कमी होत असताना करार होऊनदेखील ठेकेदाराकडून या बस दाखल करण्यास उशीर केला जात आहे. त्यामुळे ‘पीएमपी’कडून नाईलाजाने जुन्याच बस रस्त्यावर सोडल्या जात आहेत आणि त्या बंद पडण्याचे प्रमाणही वाढत आहे. याचा त्रास प्रवाशांना […]