मुंबई : ‘वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेची जबाबदारी पूर्वीप्रमाणे राज्यांकडे सोपविण्याचा विचारही पुढे आला असून, केंद्र सरकार त्यासंदर्भात तपासणी करून निर्णय घेणार आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी विधानसभेत दिली. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेतील घोटाळ्याचे पडसाद शनिवारी विधानसभेत उमटले. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.नीट परीक्षा प्रक्रियेतील घोटाळ्याप्रकरणी […]