मुंबई: लोकसभेनंतर राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक असेल. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास पक्षानं सुरुवात केली आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. याच दरम्यान सोमवारी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांची एक बैठक झाली. त्यात निवडणुकीच्या तयारीवर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीसाठी […]