मुंबई : पुणे शहराच्या परिसरातील ५०० खाणींसह बांधकाम प्रकल्पांच्या बेसमेंटमधून सुमारे पाच कोटी ब्रास दगडाचे बेकायदा उत्खनन करण्यात आल्याचा अंदाज सरकारी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत असून, त्यामुळे तीन हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व खाणींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.पुणे शहर […]