प्रतिनिधी, मुंबई : पावसाळा सुरू होताच दूषित पाण्यामुळे आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांची तीव्रता वाढते. यावर्षी जून महिन्यामध्ये मलेरिया आणि गॅस्ट्रो या दोन्ही रुग्णांची संख्या अधिक होती. या दोन्ही आजारांची रुग्णसंख्या इतर आजारांच्या तुलनेमध्ये अधिक असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले. जूनमध्ये मलेरियाच्या ४४३ रुग्णसंख्येची नोंद झाली, तर गॅस्ट्रोचे ७२२ रुग्ण नोंदवण्यात आले आहे. […]