टीम मटा, मुंबई : भारतीयांसाठी क्रिकेट म्हणजे प्रेम, जोश, उत्साह… आणि त्यात जगज्जेतेपदाचे निमित्त असेल तर आनंदाचा परमोच्च क्षण… हाच माहोल गुरुवारी मुंबईत होता. गेल्या शनिवारी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकत जगज्जेतेपद पटकावणाऱ्या विश्वविजेत्या टीम इंडियाच्या मिरवणुकीचे आयोजन बीसीसीआयने एनसीपीए ते वानखेडे स्टेडियमदरम्यान केले होते. जगज्जेत्यांच्या या मिरवणुकीसाठी अरबी समुद्राच्या साक्षीने क्रिकेटप्रेमींचा जनसागर लोटला होता. […]