मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती व जमातींच्या जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला महायुती सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळण्यास येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम २०००मध्ये सुधारणा करण्याचा निर्णयास या बैठकीत मान्यता दिली […]