बारामती (दीपक पडकर): लोकसभा निवडणूकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच बारामतीत पवारांच्या दोन्ही गटातील यंग ब्रिगेड पुढील विधानसभेसाठी आत्तापासूनच तयारीला लागली आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडून युगेंद्र पवार यांनी जनता दरबाराचे आयोजन करत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय यांनीही राष्ट्रवादी भवनात जनता दरबार […]