प्रतिनिधी, मुंबई : मुलुंड, भांडुप व नाहुरपर्यंत पसरलेल्या ७८२ एकर मिठागर जमिनीचा भाडेपट्टा रद्द करण्याचा मिठागर उपायुक्तांचा सन २००५मधील आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच वैध ठरवला आहे. त्यामुळे या जमिनीपैकी आवश्यक जमीन ही गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या विस्तारासाठी संपादित करण्याची प्रक्रिया करण्याचा मुंबई महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.९९ वर्षांचा भाडेपट्टा रद्द करण्याच्या मिठागर उपायुक्तांच्या १ एप्रिल […]