प्रतिनिधी, पुणे : कुख्यात बापू नायर टोळीतील सराईत गुन्हेगार तबरेझ सुतार याने कारागृहातून व्यावसायिकाशी संपर्क साधून दहा लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. थोडथोडक्या नव्हे, तर १४ मोबाइल क्रमांकांचा वापर करून त्याने संबंधित व्यावसायिकाला धमकावून आणखी तीस लाख रुपयांची खंडणी मागितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चौघांविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]