प्रतिनिधी, मुंबई / म. टा. वृत्तसेवा चिपळूण महाराष्ट्रातील मडुरे ते गोव्यातील पेडणे स्थानकादरम्यान असलेल्या पेरनेम (पेडणे) बोगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल-पाणी रुळांवर आल्याने खोळंबलेली कोकण रेल्वे वाहतूक जवळपास ६ तासांनी रुळांवर आल्याचा दावा कोकण रेल्वेने केला आहे. रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर वेग मर्यादेसह रखडलेल्या मेल-एक्स्प्रेस रवाना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आणि गोवा हद्दीवर असलेल्या दोन स्थानकादरम्यान पेडणे […]