पुणे : राज्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावण्यास सुरुवात केली असली, तरी प्रत्यक्षात त्यामुळे साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची निर्मिती वाढली आहे. त्यामुळे राज्यात डेंगीचे पावणेसहा हजार रुग्ण आढळले असून, त्यापैकी चौघांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढली असून, गेल्या वर्षी जुलैअखेर ३,१६४ रुग्ण आढळले होते. त्याबरोबर चिकुनगुनियाचेही रुग्ण […]