संदीप भातकर, येरवडा : कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात विशेष पथकाने घेतलेल्या झडतीत पंचवीस दिवसांत ८०हून अधिक कैद्यांकडे मोबाइल मिळाले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्याने कारागृह प्रशासनाने दोन तुरुंग अधिकाऱ्यांसह नऊ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘मटा’ला ही माहिती दिली. कळंबा […]