मुंबई : करोना संकटाचा फटका देशभरात कित्येक व्यावसायिकांना बसल्यानंतर अनेकांनी आकस्मिक व अपरिहार्य कारणामुळे व्यवसाय करणे शक्य नसल्याच्या करारनाम्यातील विशिष्ट तरतुदीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. अनेकांना तसा लाभ मिळवणे शक्यही झाले नसेल. परंतु, असेच एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात आले असता, रेल्वे स्थानकातील एका स्टॉलधारकाला नुकताच दिलासा मिळाला आहे. ‘करोना संकटाचा फटका जगभरातील मानवतेला जवळपास […]