प्रतिनिधी, मुंबई: राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या तीनही विभागांमध्ये कमाल तापमान ४० अंशांपलीकडे नोंदले गेले. मुंबईतही कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांहून अधिक असल्याची नोंद झाली. रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने उष्णतेच्या लाटेचा सामना करत मुंबईकर इच्छित स्थळी पोहोचले. एप्रिलमधील ही दुसरी उष्णतेची लाट होती. मे महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, […]