मुंबई: लोकसभा निवडणुकीपाठोपाठ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात बाजी मारल्यानंतर ठाकरेसेनेनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मुंबईतील वर्चस्व कायम राखण्यासाठी ठाकरेसेना २५ जागांसाठी आग्रही आहे. लोकसभेला ठाकरेसेनेनं मुंबईतील ६ पैकी ३ जागा जिंकल्या. यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मुंबईत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी ठाकरेसेनेनं मोर्चेबांधणी केली आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेनेनं १४ जागा जिंकल्या. पक्षफुटीनंतर ४० आमदार […]